एकीकडे दुष्काळ दुसरीकडे महापुराची
किंवा जागतिक आदिवासी दिनाची
बातमी वाचत गरम होऊन
समकालीन चर्चेत मग्न झालेला विचारवंत
क्लोरोफ्लोरो फ़ैलावत
एसीच्या हवेत
डोकं थंड करण्याचा प्रयत्न करतो...
हे सर्व विसरून
ऐन पंचविशीत आलेली त्याची मनबुद्धी
आपल्या एकतर्फी प्रेम असलेल्या प्रेयसीच्या
वॉल वरील फोटो बघत,
कॅप्सन वाचत
मनमिळावू स्वप्ने रचू म्हणत होती ...
पण उकिरड्यावर पडलेलं घर,
गावाकुसा बाहेर फेकलेला समाज,
इतिहास, राजकारण,
श्वासा-श्वासात दडलेल्या भेदाभेदीच्या कहाण्या
ज्ञानाची गरज समजावून भाग पाडतात
कि भाई
तुझं दुतर्फी प्रेम पुस्तकांवरच लवकर होईल
तेंव्हा कुठे ज्ञानाचं,
इतिहासाचं,
राजकारणाचं
अन प्रेमाचपण द्वंद्व मिटनं...
~ ज्ञानेश