ज्योतिबां


ज्योतिबांना नमस्कार। मनोभाव करतसे
ज्ञाना मृत आम्हा देई। आशा जीवन देतसे
थोर जोति दीन शूद्रा। अतिशूद्रा हाक मारी
ज्ञान ही ईषा देई। ती आम्हाला उद्धरी...
'माझ्या जीवनात। ज्योतिबा स्वानंद।।
जैसा मकरंद। कळीतला...

'ज्योतीबांचे बोल। मनात परसा
जीवाचा आरसा। । पाहते मी
सेवेच्या भावाने। सेवा जे करती
धन्यता पावती। मानवात'

शूद्राना सांगण्याजोगा। आहे सोन्याचामार्ग हा
शिक्षणाने मानुष्यत्व। पशुत्व हाटते पहा
विद्या ही धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी। ज्ञान तो मानती जन
उठा बंधुनो अतिशूद्रानो, जागे होऊन उठा
परंपरेची गुलामगिरी ही तोंडणेसाठी उठा
बंधुनो शिकण्यासाठी उठा'

~ सावित्री बाई फुले, काव्यफुले (१८५४)