अमाप इच्छांना
तू रगडलयसं
भाकरीच्या पिठासारखं
मी मात्र उब मानून
सतत शेकत राहिलो देह माझा
तुझ्या पोळलेल्या
हातांच्या स्पर्शांनी_
---
म्हणून आज बाहेर
कसाही पाऊस पडत असला
गारा पडल्या
आकाश सप्तरंगी झालं
तरी करपलेल्या माझ्या मनाला
कविता सुचते
तुझ्या आकांताची
जेवतांना...
जेवण बनवतांना
~ ज्ञानेश
दु. ४:५०; १५ जुलै २०१८
जेवण बनवतांना
~ ज्ञानेश
दु. ४:५०; १५ जुलै २०१८